Mumbai News : ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री, आमदार नंतर आता खासदार झाले रिक्षाचालक

खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांचा रिक्षाचालक, नोकरदार ते राजकारण असा प्रवास
Mumbai News
Mumbai Newsesakal
Updated on

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील बड्या राजकीय नेतेमंडळींचा जीवन प्रवास पाहता अनेक जण पूर्वी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.यामध्ये मुख्यमंत्री, आमदार यांचा खासकरून समावेश आहेत. यातच आता खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे हे देखील पूर्वी रिक्षा चालवायचे हे त्यांनी आपल्या एका भाषणात सांगितले आहे. खासदार झाल्यानंतर बाळ्या मामा यांनी आपला जीवनप्रवास सांगताना ही आठवण सांगितली खरी..परंतु यामुळे येथील रिक्षाचालक राजकारणात सक्रिय होत पुढे बडे राजकीय नेते झाल्याचे दिसून येत आहे.

Mumbai News
Nashik News : पाइपच्या गळतीने टाकीतील रोज हजारो लिटर पाणी वाया! येवल्यात टंचाई असूनही गळतीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष

बदलापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी आपल्या जीवन प्रवासातील काही आठवणी सांगितल्या आहेत. एका भाषणात त्यांनी आपण रेमंड मध्ये नोकरी करायचो, रिक्षा देखील चालवली असे सांगत मी आगरी, मराठी आणि हिंदू असल्याचा अभिमान आहॆ असे सांगितले. दरम्यान बाळयामामा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहॆ.

Mumbai News
Nashik Crime News : 5 वर्षांपासून वीज चोरी! 8 लाखांची फसवणूक

बदलापूर मध्ये काय म्हणाले बाळ्या मामा....

मी पूर्वी रेमंड मध्ये काम केलं, रिक्षा देखील चालवली.

90 ते 96 मध्ये रेमंडची नोकरी केल्यानंतर मी त्यावेळेस त्या परिस्थितीत नोकरी सोडली आणि छोटा मोठा व्यवसाय चालू केला. आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आणि समाजातील वरिष्ठ ज्यांनी ज्यांनी आयुष्यात मला मार्गदर्शन केलं ज्यांचं ज्यांचं आशीर्वाद लाभले आणि म्हणून आज आपल्यासमोर आपल्या समाजाचा खासदार म्हणून मी उभा आहे. आणि याच श्रेय मी खास करून समाजातील व्यक्तींना देईल. मी जरी समाज जात भेद मानत नसलो तरी सुद्धा पहिल्यांदा मी आगरी आहे, मी मराठी आहे, मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे असे ते म्हणाले.

हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमातून जास्त व्हायरल होत असून ठाणे जिल्ह्यातील रिक्षा चालक नंतरच्या काळात राजकीय नेते होतात हे दिसून आले आहॆ. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गणपत गायकवाड हे पूर्वी रिक्षाचालक होते, नंतर ते राजकारणात सक्रिय झाले. यातच आता अजून एका नेत्याचे नावं भर पडले असून ते म्हणजे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळयामामा म्हात्रे यांचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com