CNG -PNG Price: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; CNG-PNGच्या दरात होणार वाढ, जाणून घ्या नवे दर

CNG -PNG Price: आज रात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू होणार आहेत. सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला या दरवाढीमुळे पुन्हा एकदा कात्री लागणार आहे.
CNG -PNG Price
CNG -PNG PriceEsakal

मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये उद्यापासून म्हणजेच ९ जुलैपासून वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावर पुन्हा एकदा भार पडण्याची शक्यता आहे. आज रात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू होणार आहेत. सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार आहे.

सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडने घेतला असून आज रात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. सीएनजीच्या दरामध्ये दीड रुपयांनी वाढ होणार असून मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये मोजावे लागणार आहे. तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार असून पीएनजीचा दर ४७ रुपयांवरून ४८ रुपये इतका होणार आहे.

CNG -PNG Price
Sharad Pawar: 'तुतारी' आता वाजतच राहणार! निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शरद पवार यांना मोठा दिलासा

सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ होणार असल्यामुळे आता वाहन धारकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांना सीएनजीच्या खरेदीसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे. सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात आता मुंबईकरांचा प्रवास देखील महाग होण्याची आता शक्यता आहे. कारण मुंबईतील बऱ्याच रिक्षा, टॅक्सी या सीएनजीवर चालतात, त्यामुळे त्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

CNG -PNG Price
Army Convoy Attacked : काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशवादी हल्ला; जवानांचं चोख प्रत्युत्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com