

Sandeep Naik Join BJP
ESakal
नवी मुंबई : विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे संदीप नाईक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर बराच काळ राजकीय वनवासात असलेले संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये सामील झाले. काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाबद्दल त्यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.