esakal | MPSC परीक्षा रद्द झाल्यांनतर मुख्यमंत्र्यांची OBC नेत्यांसोबत बैठक, तात्काळ बैठकीचं कारण अत्यंत महत्त्वाचं
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC परीक्षा रद्द झाल्यांनतर मुख्यमंत्र्यांची OBC नेत्यांसोबत बैठक, तात्काळ बैठकीचं कारण अत्यंत महत्त्वाचं

OBC आरक्षणाला धक्का न देता मराठा आरक्षण देण्यात यावं  - OBC  नेते 

MPSC परीक्षा रद्द झाल्यांनतर मुख्यमंत्र्यांची OBC नेत्यांसोबत बैठक, तात्काळ बैठकीचं कारण अत्यंत महत्त्वाचं

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : काही विद्यार्थी कोरोनाग्रस्त आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आणि मराठा समाजाची मागणी पाहता राज्यातील MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर आज जाहीर केला.

येत्या ११ तारखेला महाराष्ट्रातील विविध सेंटर्समध्ये या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र मराठा समाजाने आणि संभाजीराजे छत्रपती यांनी परीक्षा होऊ नये ही मागणी लावून धरलेली. सर्व बाबींचा विचार करून, अखेर आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केलाय. 

दरम्यान, आज निर्णय जाहीर केल्यानंतर, MPSC परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची OBC नेत्यांसोबत बैठक सुरु झालीये. ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊ नये अशी मागणी OBC नेते आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली होती. MPSC परीक्षा देणारे विविध समाजाचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊ नये अशी मागणी छगन भुजबळ यांनी केलेली. दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाच्या OBC नेत्यांची बैठक सुरु आहे. यामध्ये विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे आदी नेते उपस्थित आहेत. 

महत्त्वाची बातमी : 'एमपीएससी'ची राज्य सेवा पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारचा निर्णय

OBC आरक्षणाला धक्का न देता मराठा आरक्षण देण्यात यावं अशी या नेत्यांची मागणी आहे. काही मराठा नेत्यानी OBC महिला आरक्षण मराठा समाजाला मिळावं अशी मागणी केलेली. मात्र या मागणीला OBC समाजाचा विरोध आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी याबाबतच एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यामध्ये एक अहवाल तयार करण्यात आलेला. त्या अहवालातील मागण्या आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे .

OBC नेत्यांच्या बैठकीनंतर  धनगर समाजाच्या नेत्याशी देखील मुख्यमंत्री भेटणार असल्याची माहिती आहे.   
after postponing MPSC exams CM starts his meeting with OBC leaders