मोठी बातमी - दोन दिवस कमी झालेली कोरोना रुग्णाची संख्या आज पुन्हा  वाढली  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

328 नवीन रुग्णांचे निदान, 365 रुग्ण बरे होऊन घरी , एकूण रुग्ण संख्या 3648

मुंबई, ता. 18 : काल 118 रुग्ण संख्या असताना आज राज्यात कोरोनाबाधीत 328 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या  3648 झाली आहे. आज दिवसभरात 34  रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 365 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 3072 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 67 हजार 468 नमुन्यांपैकी 63 हजार 476 जणांचे कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर  3648 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 82 हजार 299 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6999 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 11 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 211 झाली आहे. (या पूर्वी 11 एप्रिल रोजी कळवलेला एक मृत्यू कोरोना निगेटिव्ह असल्याचे मुंबई मनपाने कळवल्याने सदर मृत्यू एकूण मृत्यूमधून वगळण्यात आला आहे.)

मोठी बातमी - २० एप्रिलपासून सुटणाऱ्या अतिरिक्त बसेसची लिस्ट...  

आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई  येथील 5 आणि पुणे येथील 4  तर 1 मृत्यू औरंगाबाद मनपा आणि 1 मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. त्यात 6 पुरुष तर 5  महिला आहेत. त्यामध्ये  60 वर्षे किंवा त्यावरील  5 रुग्ण आहेत तर 6  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत.  मृत्यूमुखी पडलेल्या 11 जणांपैकी 9 रुग्णांमध्ये ( 82 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. 

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 2268 (126)

 • ठाणे: 18 (2) 
 • ठाणे मनपा: 116 (2)
 • नवी मुंबई मनपा: 65(3)
 • कल्याण डोंबवली मनपा: 73 (2)
 • उल्हासनगर मनपा: 1
 • भिवंडी निजामपूर मनपा: 4
 • मीरा भाईंदर मनपा: 64 (2)
 • पालघर: 21 (1)
 • वसई विरार मनपा: 62 (3)
 • रायगड: 13
 • पनवेल मनपा: 29 (1)
 • ठाणे मंडळ एकूण: 2734 (142)

खुशखबर ! बांधकाम कामगारांच्या थेट खात्यात येणार 'इतके' पैसे 

नाशिक: 3

 • नाशिक मनपा: 5
 • मालेगाव मनपा:  45 (2)
 • अहमदनगर: 19 (1)
 • अहमदनगर मनपा: 9
 • धुळे: 1 (1)
 • धुळे मनपा: 00
 • जळगाव: 00
 • जळगाव मनपा: 2 (1)
 • नंदूरबार: 00
 • नाशिक मंडळ एकूण: 85 (5)

पुणे: 11 (1)

 • पुणे मनपा: 528 (49)
 • पिंपरी चिंचवड मनपा: 45(1)
 • सोलापूर: 00
 • सोलापूर मनपा: 14 (1)
 • सातारा: 11 (2)
 • पुणे मंडळ एकूण: 616(54)

कोल्हापूर: 2

 • कोल्हापूर मनपा: 3
 • सांगली: 26
 • सांगली मिरज कुपवाड मनपा:00
 • सिंधुदुर्ग: 1
 • रत्नागिरी: 6 (1)
 • कोल्हापूर मंडळ एकूण: 38 (1)

औरंगाबाद:00

 • औरंगाबाद मनपा: 29 (3)
 • जालना: 2 
 • हिंगोली: 1 
 • परभणी: ०
 • परभणी मनपा: 1
 • औरंगाबाद मंडळ एकूण: 33 (3)

मोठी बातमी -  काय 20 एप्रिलनंतर घरपोच मद्य विक्री? एक मिनिट, आधी ही बातमी वाचा... 

लातूर: 8

 • लातूर मनपा: 00
 • उस्मानाबाद: 3 
 • बीड: 1
 • नांदेड: 00
 • नांदेड मनपा: 00
 • लातूर मंडळ एकूण: 12

अकोला: 7 (1)

 • अकोला मनपा: 8
 • अमरावती: 00
 • अमरावती मनपा: 6 (1)
 • यवतमाळ: 13
 • बुलढाणा: 21 (1)
 • वाशिम: 1
 • अकोला मंडळ एकूण: 56 (3)

नागपूर: 2

 • नागपूर मनपा: 58 (1)
 • वर्धा: 00
 • भंडारा: 00
 • गोंदिया: 1
 • चंद्रपूर: 00
 • चंद्रपूर मनपा: 2
 • गडचिरोली: 00
 • नागपूर मंडळ एकूण: 63 (1)

इतर राज्ये: 11 (2)
एकूण: 3648 (211)
(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्ध करून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या   344 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 5994 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी  23 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after two days drop once again corona cases in maharashtra increased