esakal | काय 20 एप्रिलनंतर घरपोच मद्य विक्री? एक मिनिट, आधी ही बातमी वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

विदर्भातील मद्य विक्रेत्यांचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन 

काय 20 एप्रिलनंतर घरपोच मद्य विक्री? एक मिनिट, आधी ही बातमी वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारमान्य मद्य विक्रीची दुकानेही सध्या बंद आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडतो आहे. सोमवार (ता.20)पासून राज्यात लॉकडाऊन सशर्थ शिथील होत असल्याने, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये गर्दी टाळण्यासाठी घरपोच मद्य पार्सल विक्रीची परवानगी देण्याची मागणी विदर्भातील मद्य विक्रेत्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन या विक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना ईमेलद्वारे पाठवले आहे.

२० एप्रिलपासून सुटणाऱ्या अतिरिक्त बसेसची लिस्ट...  

राज्य सरकारने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या आधारावर रेड, ऑरेंज, ग्रीन झोन तयार केले असून सोमवारपासून या झोनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन शिथील केले जाणार आहे. सध्या नागरिकांना मद्य मिळत नसल्याने, वाईन शॉप, बार, बियर शॉपीमध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे. तर चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेला मद्याचा साठा देखील उत्पादन शुल्क विभागाचे गुदाम फोडून चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच घडली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Lockdown 2.0 सुरु राहणारच, पण 20 एप्रिलनंतर सुरु होणाऱ्या गोष्टींवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात...

मद्य विक्री बंद असल्याने या व्यावसायातील कर्मचाऱ्यांवरही बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे 20 एप्रिलपासून राज्यातील बरेच उद्योग सुरू होण्याचे संकेत असताना, ग्रीन, ऑरेंज झोन मधील मद्य विक्री व्यवसाय सुरू करता येणार आहे. त्यासाठी पार्सल पद्घतीने घरपोच मद्यविक्री करण्याची परवानगी देण्याची मागणी विदर्भातील मद्य विक्रेत्यांनी केली आहे. 

झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना व्हायरस...

मद्यविक्री बंद असल्याने आधीच राज्य सरकारचे कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील मद्य विक्रेत्यांना सर्व प्रकारचे मद्य पार्सल पद्धतीने विक्री करण्याची परवानगी दिल्यास ग्राहकांची गर्दी टाळता येणार आहे. त्यामुळे राज्याचा महसूलदेखील वाचेल आणि सोशल डिस्टन्सिगचे पालनसुद्धा होईल. 
- अशोक जयस्वाल,
मद्य विक्रेता, नागपूर 

Home selling alcohol after April 20 ...!

loading image