esakal | BIG BREAKING : ठाण्यात 2 ते 12 जुलैपर्यंत पुनश्च लॉकडाऊन; महापालिका आणि पोलिस आयुक्तांच्या बैठकीत निर्णय...
sakal

बोलून बातमी शोधा

thane

दरम्यान, त्यानंतर सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदशर्नाखाली पालिका अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत केवळ हॉटस्पॉट बंद करुन चालणार नसल्याचे प्रत्येक उपायुक्तांनी सांगितले.

BIG BREAKING : ठाण्यात 2 ते 12 जुलैपर्यंत पुनश्च लॉकडाऊन; महापालिका आणि पोलिस आयुक्तांच्या बैठकीत निर्णय...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ठाणे : ठाणे शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरातील केवळ काही हॉटस्पॉटच पूर्णपणे बंद करुन चालणार नाहीत, उलट त्यामुळे त्या भागातील नागरीक इतर भागात जाऊ शकतात आणि त्या भागातील कोरोनाच्या रुग्ण संख्येतही वाढ होऊ शकते, अशी शक्यता असल्याने 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने जाहीर केला आहे. 

महामुंबईतील 'या' क्षेत्रांमध्ये पुन्हा लॉकडाऊन; संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी

या कालावधीत शहरात केवळ मेडिकल, दवाखाने आणि दुधाचीच दुकाने सुरु राहणार असून इतर सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लॉकडाऊनची सूचना केली होती.  अनलॉक जाहीर झाल्यापासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. झोपडपटटी पाठोपाठ अनेक सोसायटींमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगर आदीसह इतर भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

अशावेळी सुरवातीला ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ते भाग शोधून ते भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करुन त्या भागांमध्येच बंद करण्याची चर्चा मागील दोन दिवस सुरु होती. त्यानुसार 22 ठिकाणीही निश्चित करुन त्या ठिकाणांमधील हॉटस्पॉटही निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतर सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदशर्नाखाली पालिका अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत केवळ हॉटस्पॉट बंद करुन चालणार नसल्याचे प्रत्येक उपायुक्तांनी सांगितले. कारण या हॉटस्पॉटमधील नागरिक दुसऱ्या भागात ये-जा करतात, त्यामुळे इतर भागातही कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे हॉटस्पॉटच नाही तर संपूर्ण ठाणो शहर बंद करावे यावर एकमत झाले. त्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याबरोबर देखील पालिका आयुक्तांची बैठक झाली.

वारकऱ्यांची थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, 'ही' आहे मागणी..

या बैठकीत संपूर्ण ठाणे शहर बंद करण्यावर एकमत झाले. त्यानुसार 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत संपूर्ण ठाणे शहर बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 


काय बंद राहणार
या कालावधीत शहरातील अंतर्गत रस्ते बंद राहणार असून, प्रत्येक महत्वाच्या स्पॉटवर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. याशिवाय शहरातील किराणा मालाची दुकाने, इतर साहित्याची दुकाने, भाजी मार्केट हे सर्व देखील या कालावधीत बंद राहणार आहेत. कोणालाही विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही.


काय सुरु राहणार
या 10 दिवसांच्या बंदच्या काळात केवळ दूधाचे दुकाने, मेडिकल आणि दवाखाने सुरु राहणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच या कालावधीत ये-जा करण्याची मुभा असणार आहे. 

मोठी बातमी - शिवसेना भवन आता शिवसैनिकांसाठी काही दिवस बंद, कारण आहे..

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेतला आहे. सुरवातीला हॉटस्पॉट बंद करण्याचा विचार होता. परंतु त्यामुळे पूर्णपणे नियंत्रण मिळवता येईल असे नाही. त्यामुळे संपूर्ण ठाणे शहर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
- गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका.

loading image