वारकऱ्यांची थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, 'ही' आहे मागणी..

वारकऱ्यांची थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, 'ही' आहे मागणी..

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. याच धर्तीवर यंदाचे सर्व सण आणि उत्सव कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरे करण्यात येतायत. याला यंदाची वारी ही देखील अपवाद नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालत निघणाऱ्या वारीला परवानगी नाही. वाखरी ते पंढरपूर अशी पायी वारी काढू द्यावी यासाठी आता वारकरयांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. जगन्नाथ पुरी रथ यात्रेला जर परवानगी मिळत असेल तर वारीला का नाही असा सवाल करत पुण्यातील वारकरी सेवा संघाकडून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. काही अटी आणि शर्थींसह वारीला देखील परवानगी द्यावी अशी मागणी आता केली जातेय. 

काय आहे वारकऱ्यांची मागणी ? 

  • वाखरी ते पंढपूर हे १०० किलोमीटरचं अंतर वारकर्यांना पायी कापायचं आहे.
  • यासाठी १०० वारकऱ्यांना वाखरी ते पंढरपूर वारी काढण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली जातेय.
  • सोबतच वारीतील महत्त्वाच्या परंपरा म्हणजे नगर प्रदक्षणा, स्नान आणि गोपाळकाला सोबतच पौर्णिमेपर्यंत मुक्कामी राहण्याची परवानगीही मागण्यात आलीये. 

मुख्यमंत्री जाणार पंढरपूरला 

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात पूजा केली जाते. वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून मी पंढरपुरात जाणार आहे. आपली आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी मी पंढरपुरला चाललो आहे. विठूरायाला कोरोनाचं संकट संपवण्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्य मागण्यासाठी साकडं घालणार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 

पालखी सोहळा आणि चालत वारी रद्द, मात्र संतांच्या पादुका पोहोचणार पंढरपुरात 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांचंदाचं पंढरपूरची वारी रद्द करण्यात आली. २९ मे रोजी हा सरकारने हा निर्णय घेण्यात. मात्र आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय जरी घेण्यात आला असला तरीही ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांसह सर्व संतांच्या पादुका या पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात येणार आहेत. शिवनेरी बसमधून या पादुका पंढरपुरात नेल्या जाणार असल्याचं बोललं जातंय.

warkari community from pune filed petition in mumbai high court read full news  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com