विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर थेट मारला 'PROMOTED (COVID-19)' चा शिक्का, आता मंत्रीमहोदय म्हणतात...

सुमित बागुल
Tuesday, 14 July 2020

राज्यात शेवटच्या वर्षांच्या शेवटच्या सत्राच्या परिक्षांवरून रान उठलंय. एकीकडे सरकार शेवटच्या वर्षाच्या, शेवटच्या सत्राच्या परीक्षा न घेण्यावर ठाम आहे.

मुंबई - राज्यात शेवटच्या वर्षांच्या शेवटच्या सत्राच्या परिक्षांवरून रान उठलंय. एकीकडे सरकार शेवटच्या वर्षाच्या, शेवटच्या सत्राच्या परीक्षा न घेण्यावर ठाम आहे.  तर दुसरीकडे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन म्हणजेच UGC ने विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या पाहिजेत अशा गाईडलाईन्स जारी केल्यात. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये कमालीचं संभ्रमाचं वातावरण आहे. 

महत्त्वाची बातमी - वाढीव वीजबिलांविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यालयाने दिला निकाल, हायकोर्ट म्हणतंय...

अशातच आज अमरावतीच्या 'श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ हॉस्टिकल्चरच्या B'Sc हॉर्टीकल्चरच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचा एक फोटो फोटो चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोत गुणपत्रिकेवर थेट 'PROMOTED (COVID 19)' असं नमूद करण्यात आलंय. अकोला महाविद्यालया अंतर्गत हे कॉलेज येतं. या कॉलेजमधील २४७ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'PROMOTED (COVID 19)' असा शिक्का मारण्यात आलाय.  

महत्त्वाची बातमी - 'राजगृह'वर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीबाबत धक्कादायक माहिती आली समोर, पोलिस म्हणतात...

कृषी मंत्र्यांनी केली कारवाई : 

या वादात आता हस्तक्षेप करत स्वतः कृषिमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॉलेजकडून देण्यात आलेल्या जुन्या गुणपत्रिका परत घेऊन विद्यार्थ्यांना नवीन गुणपत्रिका दिल्या जातील असं दादा भुसे म्हणालेत. सोबतच दादा भुसे यांनी महाराष्ट्रातील कृषीसंबंधित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील आश्वस्त केलंय. कोणत्याच कृषी विद्यापीठाच्या गुणपत्रिकांवर 'PROMOTED (COVID 19)'  असं लिहिलं जाणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. सोबतच हा प्रकार ज्याने केला असेल किंवा ज्याच्याकडून हा प्रकार घडलाय त्यांची चौकशी करून याबाबत कारवाई केली जाणार असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय. 

agriculture minister dada bhuse on PROMOTED COVID 19 stamp on results of students mark sheet


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture minister dada bhuse on PROMOTED COVID 19 stamp on results of students mark sheet