

Digital Lounge At Mumbai Central
ESakal
मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर बांधण्यात येणाऱ्या डिजिटल लाउंजचे काम वेगाने सुरू आहे. अहवालानुसार, डिसेंबर अखेरीस ते कार्यान्वित होईल. मे २०२५ मध्ये २.७१ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. हा प्रकल्प पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवला जात आहे. हा लाउंज १,७१२ चौरस फूट जागेत बांधला जात आहे. भारतीय रेल्वेमध्ये अशा प्रकारचे हे पहिले लाउंज बांधले जात आहे. हा निर्णय २०१९ मध्ये घेण्यात आला होता.