पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं ट्विट का डिलीट केलं ? स्वतः अजित पवारांनी सांगितलं कारण

सुमित बागुल
Friday, 25 September 2020

ट्विट डिलीट केल्यानंतर अजित पवारांनी स्वतः याबाबत आपलं मत माध्यमांसमोर मांडलं.

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज एक ट्विट केलं होतं. मात्र अगदी काही वेळातच अजित पवार यांनी आपलं ट्विट मागे घेतलं, डिलीट केलं. आधी ट्विट केल्याने आणि त्यानंतर ट्विट मागे घेतल्याने राजकीय पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं. मात्र स्वतः अजित पवार यांनी आपण केलेल्या ट्विटबाबत आणि त्यानंतर ते डिलीट केल्याबाबत खुलासा केलाय. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे जनसंघाचे सहसंस्थापक. त्यांच्या जयंतीनिमित्त अजित दादांनी ट्विट केलं होतं. 

महत्त्वाची बातमी : भिवंडी इमारत दुर्घटनेत २० चिमुरड्यांचा निप्षाप बळी

ट्विटमध्ये नक्की लिहिलं होतं ? 

आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. जयंतिमिनित्त अजित पवार यांनी दीनदयाळ उपाध्याय  यांना अभिवादन केलेलं आणि आपल्या ट्विटमध्ये अजित दादांनी लिहिलं होतं की, "भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन." 

महत्त्वाची बातमी : कारवाईसाठी व्हॉट्सअॅप चॅट हा सक्षम पुरावा असू शकत नाही, उज्ज्वल निकम यांची माहिती

का डिलीट केलं ट्विट ? 

ट्विट डिलीट केल्यानंतर अजित पवारांनी स्वतः याबाबत आपलं मत माध्यमांसमोर मांडलं. अजित पवार म्हणालेत की, "ज्या व्यक्ती आता हयात नाहीत, त्यांच्याबाबत आपण चांगलं बोलतो. आपली ही संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलं होतं. मात्र समाजकारण आणि राजकारण करताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं आणि इतरही गोष्टी असतात, म्हणून ते ट्विट डिलीट केल्याचा खुलासा अजित पवार यांनी स्वतः केला.

ajit pawar deleted tweet done for pandit dindayal upadhyay and shared reason


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar deleted tweet done for pandit dindayal upadhyay and shared reason