आकाश जाधव मृत्यू प्रकरण पुन्हा तापणार; ऍट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल होऊनही अटक नाही

आकाश जाधव मृत्यू प्रकरण पुन्हा तापणार; ऍट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल होऊनही अटक नाही

मुंबई  : सांताक्रुझ येथे आकाश जाधव या तरुणाचा खून झाला. या प्रकरणी खून व ऍट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल होऊन दीड महिना झाला तरी अद्याप एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. आरोपींना तातडीने अटक करावी व पीडित कुटुंबाला मदत मिळण्याबाबत जातीअंत संघर्ष समिती व बौद्धजन पंचायत समितीतर्फे सोमवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे.

आकाश जाधव या तरुणाला हनुमान टेकडी, सांताक्रुझ पूर्व येथे गुंडांनी बेदम मारहाण केली होती. त्याचा कूपर रुग्णालयात मृत्यू झाला. घटनेला दीड महिना होऊनही या आरोपींना अटक झाली नाही. मुलाच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने वडील जयराम जाधव यांचेही निधन झाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पीडित जाधव कुटुंबाच्या घरी सांत्वनपर भेट देऊन आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश आठवले यांनी पोलिसांना दिले होते. यानंतरही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही.

त्यामुळे या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, वांद्रे पूर्व येथे निषेध करण्यात येणार आहे. कार्यक्रमात जातीअंत संघर्ष समिती, बौद्धजन पंचायत समिती, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, प्रबोधन युवा संघ, संविधान संवर्धन समिती मुंबई, नारी अत्याचारविरोधी मंच, संविधान जागर समिती, आम आदमी पक्ष आणि मुंबईतील विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, नेते उपस्थित राहणार आहेत, असे शैलेंद्र कांबळे, सुबोध मोरे, रेखा देशपांडे, गणेश खैरे यांनी कळविले आहे. 

Akash Jadhav death case No arrests have been made despite charges of atrocities

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com