मद्यप्रेमींचा हिरमोड, 'या' जिल्ह्याच्या शहरी भागात दारूबंदी कायम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

जिल्ह्यातील महापालिका,  नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील शहरी भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,  या भागांमध्ये दुकाने, मॉल्स आणि मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका,  नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील शहरी भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,  या भागांमध्ये दुकाने, मॉल्स आणि मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत. तसेच ग्रामीण भागातील कंटेंटमेंट क्षेत्र वगळून इतर ठिकाणी केवळ सील बंद मद्य विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शहरी भागातील तळीरामांच्या अपेक्षा भंग झाल्या असून मद्यप्रेमींना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. 

हे ही वाचा : 'का' वाढतोय कोरोना रुग्णांचा आकडा? मुंबई पालिकेनं घेतला शोध... 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे शहरी भागात मद्य विक्रीला सुरुवात केल्यास गर्दी आणखी वाढण्याची भिती असल्याने पुढील आदेश येईपर्यंत बंदी जारी राहणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबतची माहिती ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना कळविली असून जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश तातडीने जारी केले आहेत. 

नक्की वाचा : कोरोनावरील लस 'फास्टट्रॅक'मध्ये बनवा ! कोरोना लस निर्मितीत भारताची मजल कुठवर?

ग्रामीण भागातील परवानाधारक दुकानांमधून मद्यविक्री केली जाणार असून कंटेंटमेंट क्षेत्रात मात्र, मद्य विक्रीला परवानगी देण्यात आलेली नाही. - नितीन घुले, अधीक्षक, राज्य उत्पादन विभाग ठाणे.

Alcohol ban maintained in urban areas of Thane district


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcohol ban maintained in urban areas of Thane district