मद्यपी म्हणतात, दुधाची तहान ताकावर भागवू..!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे पनवेलमधील ग्रामीण भागात उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक ताडीकडे मद्यपींनी मोर्चा वळवला आहे.

पनवेल : लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे पनवेलमधील ग्रामीण भागात उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक ताडीकडे मद्यपींनी मोर्चा वळवला आहे. परिणामी, ताडाच्या झाडावरून ताडी उतरवणाऱ्या विक्रेत्यांचा भाव वधारला असून, काही दिवसांपुर्वी 60 रुपये लिटर प्रमाणे मिळणारी ताडी मिळवण्यासाठी एक दिवस अगोदर दूरध्वनीद्वारे आगाऊ मागणी नोंदवावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ही बातमी वाचली का? ...तर आदिवासींचे कोरोनाने नव्हे भूकबळीचे मृत्यू होतील

लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री बंद झाल्याने नियमित मद्यपान करणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. काळ्या बाजारात विदेशी तसेच देशी मद्य चौपट भावात विकले जात असल्याने मद्यपी नशेकरिता इतर पर्याय स्वीकारत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी पनवेलच्या ग्रामीण भागात सहज उपलब्ध होत असलेल्या ताडीकडे मोर्चा वळवला आहे.

ही बातमी वाचली का? एसटी अधिकारी तुपाशी, कर्र्मचारी उपाशी 

ग्रामीण भागात व्यवसाय सुरु
सध्या ताडीचा हंगाम सुरू आहे. पनवेलपासून काही किलोमीटर अंतरावर असलेला मलंगगड, रसायनी तसेच प्रबळगड परिसरात काही भागांत ताडाच्या झाडांची संख्या मोठी आहे. या भागातील काही शेतकरी वर्षानुवर्षे ताडावरून ताडीविक्रीचा व्यवसाय करीत आहेत.

ही बातमी वाचली का? धारावी झोपडपट्टीला राजेश टोपे यांची भेट

आंबलेली ताडी घातक 
ताडाच्या वृक्षापासून मिळणारी ताडी तात्काळ पिणे आरोग्यासाठी चांगले असते; मात्र झाडावरून काढल्यानंतर जास्त काळ राहिलेली ताडी आंबत असल्याने पहिल्या तीन ते आठ तासांत तिच्यात तीन टक्के एथिल अल्कोहोल तयार होतो. ही प्रक्रिया चालू राहिल्यास अल्कोहोल पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढते. त्याहून अधिक झाल्यास ताडी मादक होऊन आरोग्यास हानिकारक ठरते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The alcoholic turned the march towards natural liquor corona

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: