नागरिकांनी लढवली शक्कल आणि सावधगिरीमुळे 'अशी' फसली तिसरी चोरी

नागरिकांनी लढवली शक्कल आणि सावधगिरीमुळे 'अशी' फसली तिसरी चोरी

मुंबई : कोरोनाकाळात दहीसरमध्ये अचानक चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे तेथे नागरिकांनी रात्री गस्त घालण्याचा तसेच इमारतींमध्ये अलार्म लावण्याचा उपक्रम सुरु करण्याचे ठरविण्यात आले आहे. या बाबत काही स्थानिक नेत्यांशी चर्चा करून आणि त्यांच्या पुढाकाराने नुकतीच या विषयावर परिसरातील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. एमएचबी पोलिस ठाण्याचे वरील निरीक्षक पंडित ठाकरे व अन्य अधिकारी यावेळी  हजर होते. कोरोनाकाळात पोलिसांवरही मोठा ताण आला असल्याने त्यांचे काम हलके करण्यासाठी नागरिकांनीच काही उपाय करावेत, असेही यावेळी ठरले.  

सोसायट्यांमध्ये स्वतःचे सुरक्षा रक्षक असतातच, पण चोरीच्या घटना रोखण्यासाठी आणि रस्त्यावर गस्त घालण्यासाठी दहा सोसायट्यांनी मिळून एक वेगळा रक्षक नियुक्त करणे, या रक्षकाने रात्रपाळीच्या पोलिसांशी संपर्कात राहणे, इमारतींमधील रहिवाशांनी देखील गस्त घालणे आणि यामार्गाने पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे, गुन्हेगारांची ओळख पटण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात सीसीटीव्ही लावणे असेही यावेळी सुचविण्यात आले. यापूर्वीच घोसाळकर यांनी स्थापन केलेल्या टायगर पथकामार्फत गस्त घातली जाईल, असे सांगण्यात आले.

तर संशयास्पद हालचाली दिसल्या तर लोकांना सावध करण्यासाठी इमारतींमध्ये अलार्म लावावा, असेही सुचविण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात काही मध्यवर्ती ठिकाणांवरील इमारतींमध्ये प्रायोगिक तत्वावर असे अलार्म बसविण्याचे आश्वासन घोसाळकर यांनी दिले. दहीसरमध्ये नुकत्याच आठवड्याभरात तीन चोऱ्यांचा प्रयत्न झाला, त्यातील दोन चोऱ्या एकाच रात्रीत झाल्या. तर सावध नागरिकांमुळे तिसरी चोरी फसली.

( संपादन - सुमित बागुल ) 

alert citizens of dahisar avoided third attempt of being stolen by using theft alarm

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com