esakal | अलिबाग : गायचोळे येथे तरुणीवर हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अलिबाग : गायचोळे येथे तरुणीवर हल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : तालुक्यातील धोकवडेमधील गायचोळे येथे एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात ती जखमी झाली असून तिच्या सहकाऱ्यालाही दुखापत झाली आहे. जमीन विकसित करण्याचे काम ती करते.

हेही वाचा: कर्जत-माथेरान मिडी बससेवा सुरू

धोकवडे - गायचोळे येथे विपीन वजिरानी यांच्या मालकीची जमीन विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी वीजपुरवठा सुरू करण्यासाठी रोहित्र बसविण्यासाठी खांब लावण्याचे काम सुरू होते. ते पाहण्यासाठी ही तरुणी सहकाऱ्यांसमवेत गेली होती. त्या वेळी दिलीप म्हाळुगे, राजेश म्हाळुगे आणि १० ते १५ स्त्री-पुरुष आले. त्यातील एकाने जागेवरून वाद घातले. हा वाद विकोपाला गेला. त्या वेळी तरुणीसह तिच्या सहकाऱ्यावर हल्ला केला.

loading image
go to top