मुंबई : तलाक झालेल्या महिलांना पोटगी

न्यायालयाचा आदेश; दुसऱ्या विवाहापर्यंत अधिकार कायम
Alimony to divorced muslim women entitled to alimony until they remarry court
Alimony to divorced muslim women entitled to alimony until they remarry courtsakal

मुंबई : तलाक झालेल्या मुस्लिम महिलांना पोटगी मिळू शकते आणि जोपर्यंत त्या दुसरा विवाह करत नाही तोपर्यंत त्यांना पोटगीचा अधिकार आहे, असा निकाल दादर महानगर दंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. संबंधित याचिकादार महिलेचा विवाह २००४ मध्ये झाला होता. मात्र पतीच्या नातेवाइकांनी त्यांच्याकडे लाखो रुपयांच्या हुंड्याची मागणी करून छळ केला असा आरोप तिने केला आहे. यावर पतीने सामोपचाराने घटस्फोट घेण्याचा पर्याय तिच्याकडे ठेवला आणि एकदा कागदोपत्री लिहून सहमतीने घटस्फोट घेतला. मात्र त्यानंतर पत्नीची तब्येत ढासळली आणि तिच्या किडनीवर परिणाम झाला. त्यामुळे औषधोपचार आणि अन्य खर्चासाठी तिने पतीकडून दरमहा पोटगीची मागणी केली. मात्र ही मागणी पतीने फेटाळली. त्यामुळे तिने न्यायालयात याचिका दाखल केली.

माझा यापूर्वीच सहमतीने घटस्फोट झाला आहे आणि आता तिची जबाबदारी माझ्यावर नाही, असा युक्तिवाद पतीच्या वतीने करण्यात आला. माझ्यावर कुटुंबीयांची जबाबदारी आहे, ती स्वतः पैसे कमवू शकते, असे पतीचे म्हणणे होते. न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला. सहमतीने घटस्फोट घेतल्याचा लेखी पुरावा आरोपी पतीने सादर केला नाही. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाबाबत संभ्रम निर्माण होत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच घटस्फोट झाला असला तरी देखील पतीकडून पत्नीला पोटगी मिळू शकते, असे न्यायालयाने नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com