दिलासा ! 'या' पालिकेंतर्गत येणारी सर्व दुकाने ठराविक वेेळेत सुरु राहणार, असे आहे वेळापत्रक

shops
shops

नेरळ : एमएमआरडीएमधील नगरपालिका हद्दीत कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन व्यवसायाला मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळे कर्जत पालिकेने पुढाकार घेत सर्व व्यावसायिकांना वेळ ठरवून दिली असून त्या-त्या दिवशी ती दुकाने उघडली जाणार आहेत. दरम्यान,पालिकेने हा निर्णय घेण्यापुर्वी सरकारी अधिकारी तसेच व्यापारी फेडरेशनच्या सदस्यांबरोबर चर्चा करून मार्ग काढण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिली.

कोरोनला दूर ठेवण्यात कर्जत शहराला यश आले आहे. कर्जत शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येताच शहरात सलग चार दिवस सर्व व्यवहार बंद ठेवून लॉकडाऊनची कडकपणे अंमलबजावणी करण्यात आली; मात्र 4 मे रोजी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन अटी आणि नियम शिथिल करण्यात आले.  त्यानूसार एमएमआरडीएच्या क्षेत्रातील नगरपालिका हद्दीत कोणत्या बाबींना सूट देण्यात आली आहे, हे जाणून घेण्यासाठी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुढाकार घेतला. तसेच सर्व प्रमुख अधिकारी यांची 5 मे रोजी भेट घेतली.

जिल्हाधिकारी यांच्या निर्णयानंतर सर्व ठिकाणी व्यवहार सुरळीत झाले; मात्र कर्जत शहरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणलाही सूट देण्यात आली नव्हती. त्यामुळे नगराध्यक्ष जोशी यांनी प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि पालिका मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या सोबत चर्चा करून शासनाचे नियम आणि अटी समजून घेतल्या.  
 कर्जत व्यापारी फेडरेशन बरोबर चर्चा करून कर्जत शहरात कोणते व्यवहार कोणत्या दिवशी सुरू राहतील याबाबत नियोजन केले. राज्य सरकारचा लॉक डाऊन 18 मे पर्यंत असून त्यानुसार पालिकेने नियोजन केले. 

असे असेल वेळापत्रक
कर्जत नगरपालिका हद्दीमधील सोन्या-चांदीची तसेच हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक आणि मॅकेनिकल वर्क्स यांची दुकाने 6, 11, 12 आणि 17 मे या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. कपड्याची आणि चप्पल-बूट यांची दुकाने 7, 9, 13 आणि 19 मे या दिवशी सुरु राहतील. त्याचवेळी कटलरी, भांडी, स्टेशनरी, स्वीट आणि खाद्यपदार्थ यांची दुकाने 8,10, 14 आणि 16 मे या कालावधीत सुरु राहणार असून सर्व ठिकाणी सोशल डिस्टंन्सिग पाळण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. 

हाॅटेल मालक प्रतीक्षेत
पान टपरी, हॉटेल विक्रीच्या गाड्यांना सूट देण्यात आली नसून ते व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. तर भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू आणि दूध यांची दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे कर्जत पालिकेकडून जाहीर करण्यात आले.

All shops will open on specific time; Decision of Karjat Municipality

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com