Chitra Wagh Visit to Dahanu Police Station
sakal
तारापुर - पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरण समोर आल्याचा आरोप करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शनिवारी डहाणू पोलीस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणी दाखल गुन्ह्याबाबत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाची माहिती घेतली.