धक्कादायक ! चंदीगडनंतर IIT मुंबईत विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ, कर्मचाऱ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक ! चंदीगडनंतर IIT मुंबईत विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ, कर्मचाऱ्याला अटक

धक्कादायक ! चंदीगडनंतर IIT मुंबईत विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ, कर्मचाऱ्याला अटक

चंडीगड विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्याची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. ही घटना ताजी असतानाच आयआयटी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. आयआयटी मुंबईमधील वसतीगृहात एका विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कँटीनमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वसतिगृह 10 (H10) च्या बाथरूममध्ये एका मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. ही घटना रविवारी रात्री घडली, अशी तक्रार तिने दाखल केली. तिच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पिंटू गरिया, असे आरोपीचे नाव आहे.

मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अटकेत असणाऱ्या आरोपीच्या फोनमध्ये कोणते फुटेज व्हिडीओ आहेत का?, याबाबत चौकशी चालू आहे. तसेच कँटीनही तत्काळ बंद करण्यात आले आहे. आता केवळ महिला कर्मचारी असतानाच कँटीन सुरू राहणार आहे.

आरोपीने ज्या पाईपचा वापर केला आहे, तो परिसर सध्या ब्लॉक केला असून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत. आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे, ते सर्व आम्ही करू, असंही आयआयटी मुंबईने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे.

वसतिगृहाचे कँटीन पूर्वी पुरुष कर्मचारी चालवत होते. संस्थेने या प्रकरणावर त्वरित कारवाई करुन कँटीन बंद करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईमधील बाथरूमकडे जाणारा रस्ताही सील करण्यात आला आहे. वसतिगृह विभाग H10 चा तपास केल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर व्यवस्था करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयआयटी मुंबईचे डीन प्रोफेसर तपनेंदू कुंडू यांनी दिली आहे.

Web Title: Alleged On Iit Bombay Employee That He Shoot Abusive Video Of Girl Student In Her Bathroom

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..