मातृ वंदना योजना गर्भवतींसाठी आधार! लॉकडाऊनमध्ये ४ कोटींच्या निधीचे वाटप  

मातृवंदन योजना
मातृवंदन योजना

पालघर ः कोरोना महामारीच्या काळात शासकीय स्तरावरून ते सर्वसामान्यांपर्यंत आर्थिक घडी कोलमडलेली असताना गर्भवती महिला व स्तनदा मातांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील निधीचा लाभ दैनंदिन मिळत आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत एप्रिल ते ऑक्‍टोबर या लॉकडाऊनच्या काळात सुमारे ३ कोटी कोटी ६४ लाख लाख ९२ हजार रुपयांचा निधी पहिल्या गर्भवती असणाऱ्या मातांसाठी देण्यात आला आहे.


पालघर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविली जाते. जानेवारी २०१७ पासून ते आजतागायत ४६ हजार ५८८ महिलांना २१.९३ कोटी रुपयांचा लाभ बॅंक खात्यावर देण्यात आलेला आहे. यात पालघर ग्रामीण २७ हजार ५९७; तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील १८ हजार ९९१ महिलांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची ही योजना पहिल्या खेपेच्या गर्भवती मातांसाठी वरदान ठरते आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.
मजुरी करणाऱ्या महिला गर्भधारणेच्या काळात मजुरी करू शकत नसल्याने त्यांचा रोजगार बुडतो; शिवाय काही महिला गर्भधारणेच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहतात व प्रसूतीनंतरही लागलीच कामाला सुरवात करतात. याचा एकंदरीत परिणाम बालकांच्या व मातेच्या आरोग्यावर होतो.

पहिल्या खेपेच्या गरोदर मातांना प्रसूतीच्या अगोदर आणि प्रसूतीनंतर पहिल्या मातेला विश्रांती मिळावी व बुडित मजुरीचा लाभ व्हावा, तसेच स्तनदा मातेचे आरोग्य निरोगी रहावे, तिची शारीरिक झीज भरून निघावी व पर्यायाने बाळाला स्तनपान करता यावे, या मुख्य उद्देशाने मातृवंदना योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत पहिल्या खेपेच्या मातांना ३ टप्प्यांत ५ हजार रुपयांचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी केले आहे.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड, मातेचे आधार संलग्न बॅंक खाते किंवा पोस्ट बॅंक खाते, माता बालसंगोपन कार्डची सत्यप्रत व बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्याशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा.
- सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद

 

 

Allocation of Rs. 4 crore in Palghar through Matru Vandan Yojana

    ( संपादन ः रोशन मोरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com