कोकणपट्ट्यात अंबर अलर्ट जारी; मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

समीर सुर्वे
Saturday, 19 September 2020

: पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने मुंबई, पालघर वगळता संपूर्ण कोकणात पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे.

मुंबई : पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने मुंबई, पालघर वगळता संपूर्ण कोकणात पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अंबर अलर्ट जारी केला असून समुद्रातील वारेही वेगाने वाहणार आहेत. दरम्यान, मुंबईत आज सकाळी पावसाच्या हकल्या सरी पडल्यामुळे तापमान 2 ते 3 अंशांनी घसरले आहे. 

कंपन्यांच्या कर्ज चक्रव्युहामधून महिलांना बाहेर काढण्यासाठी राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

पश्‍चिम बंगालच्या उपसागरात 20 सप्टेंबरपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. या जिल्ह्यातील काही भागांत 204 मि.मी. पर्यंत पावसाची शक्‍यता असल्याने मंगळवारपर्यंत (ता. 22) अंबर अलर्ट जारी केला आहे. यासाठी नाविक दल, तटरक्षक दल, तसेच स्थानिक प्रशासनाला सज्जतेचा इशारा दिला आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यात मंगळवारपर्यंत जोरदार पावसाची शक्‍यता असून मुंबई आणि पालघरमध्ये हलक्‍या सरींचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ लांबणीवर; आंबेडकरी नेत्यांना निमंत्रणच नाही

मुंबईत आज सकाळी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. त्यामुळे तापमानात 2 ते 3 अंशांची घट झाली आहे. पुढील दोन दिवस मुंबईत तापमान याच पातळीवर राहण्याची शक्‍यता आहे.
अशी झाली तापमानाची नोंद (अंश सेल्सिअसमध्ये)

                 कमाल     किमान
कुलाबा       28          25.5 
सांताक्रुझ    28.8       25 अंश 

जोरदार वारे वाहणार
बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्‍चिम किनारपट्टीवरही जोरदार वारे वाहणार आहे. अरबी समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मासेमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन वेधशाळेने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amber alert issued in Konkan belt