

BJP
esakal
अंबरनाथ : नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ येऊन ठेपली असतानाच अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे शिंदे गटातील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये, तर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.