

Political Clash Between BJP And Shinde Shivsena
ESakal
डोंबिवली : अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीची तारीख 20 डिसेंबरला ढकलताच शहरातील राजकीय पट पुन्हा एकदा हलला आहे. प्रचारासाठी आधीच कोट्यवधींची उधळण केलेल्या उमेदवारांचे संपूर्ण गणित बिघडले असून, आता नव्याने रणनिती आखण्याची धडपड सुरू झाली आहे. महायुतीचे सूर राज्यात जुळत असले तरी अंबरनाथमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा थेट दोन गटांचा ‘स्ट्रेट फाइट’ आकाराला आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी मनिषा अरविंद वाळेकर (शिंदे गट) आणि तेजश्री करंजूले (भाजपा) यांच्यातील संघर्ष ही या निवडणुकीची खरी मध्यवर्ती लढत मानली जात आहे.