

Ambernath Drowning Case
esakal
अंबरनाथ : अंबरनाथमधील एका तरुण धावपटूचा पोहताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सागर सरोज असे मृत तरुणाचे नाव असून, बदलापूरजवळील कोंडेश्वर येथे ही घटना घडली. या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात तसेच क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.