esakal | अंबरनाथमध्ये कचरा उचलण्यास प्रारंभ 'सकाळ' च्या बातमीने पालिकेला जाग
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अंबरनाथमध्ये कचरा उचलण्यास प्रारंभ 'सकाळ' च्या बातमीने पालिकेला जाग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबरनाथ : दैनंदिन कचऱ्यावर मोठ्या सोसायट्यांनी (Society) प्रक्रिया करावी, या मागणीवरून गेल्या पाच दिवसांपासून अंबरनाथमधील (Ambarnath) सोसायट्यांमध्ये (Society) साचलेला कचरा नगरपालिकेने (Municipal) न उचलल्याने कचऱ्याचे ढीग झाले होते. याबाबत 'सकाळ' (Sakal) ने आज बातमी (News) प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली.

सध्या सणांचे दिवस असल्याने निर्णयाला मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून अखेर नगरपालिकेच्या आरोग्य खात्याने आज कचरा उचलून नेल्याने नागरिकांची दुर्गंधीच्या त्रासातून सुटका झाली आहे.

हेही वाचा: अंबरनाथ मनसे शहर उपाध्यक्षाची धारधार शस्त्रांनी हत्या, चारही आरोपी अटकेत

शहरातील १०० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी सोसायट्यांतील दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलणार नसल्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. त्याबाबत सोसायट्यांना नोटिसा दिल्या होत्या. या निर्णयामुळे अंबरनाथच्या पूर्व भागातील मोठ्या गृहसंकुलांत कचरा नेला नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. गुरुवारी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी गृहसंकुलातील नागरिकांशी चर्चा केली.

हेही वाचा: पुण्यात गृह विलगीकरण झालेल्यांकडून ‘ॲप’चा वापर नाही

त्या वेळी कचरा नेला नाही, तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला होता. पालिका मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन आरोग्याधिकारी सुरेश पाटील यांनी नागरिकांना दिले होते.

loading image
go to top