esakal | इच्छाशक्तीचा विजय; अवघ्या दहा दिवसांत डोंबिवलीतील 91 वर्षाच्या आजींची कोरोनावर मात..
sakal

बोलून बातमी शोधा

91 years aaji

आजाराची लागण झाल्यानंतर धसका घेतल्यानेच अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. परंतु इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही कोणत्याही वयात या आजारावर मात करु शकताच हेच जणू डोंबिवलीत कोरोनावर मात केलेल्या आजींनी सिद्ध करुन दाखविले आहे. 

इच्छाशक्तीचा विजय; अवघ्या दहा दिवसांत डोंबिवलीतील 91 वर्षाच्या आजींची कोरोनावर मात..

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

ठाणे :  कल्याण डोंबिवलीत कोरोनाने थैमान घातले असून दिवसागणित 600 च्या आसपास नविन रुग्णांची नोंद महापालिका हद्दीत होत आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर धसका घेतल्यानेच अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. परंतु इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही कोणत्याही वयात या आजारावर मात करु शकताच हेच जणू डोंबिवलीत कोरोनावर मात केलेल्या आजींनी सिद्ध करुन दाखविले आहे. 

धारावीच्या यशावर मुख्यमंत्री काय म्हणाले... 'या' शब्दात व्यक्त केल्या भावना

डोंबिवलीतील सुशिला विश्वनाथ जोशी (वय 91) या आजीने कोरोना विरोधातील लढा जिंकला असून इतरांनाही त्यांनी बळ दिले आहे. अवघ्या दहा दिवसांत त्यांनी हे शक्य करुन दाखविले असून इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कोरोना विरोधातील लढाई जिंकू शकतो हेच त्यांनी सिद्ध केले आहे. शनिवारी त्यांना घरी सोडण्यात आले असून आता त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती त्यांचा मुलगा दिलीप जोशी यांनी दिली. 

डोंबिवली पूर्वेतील छेडा रोड येथे सुशिला विश्वनाथ जोशी या राहतात. त्या काही दिवस मुलगी आणि जावयाकडे राहायला होत्या. जावयाची तब्येत ठिक नव्हती, त्यांना ताप येत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर माझ्या बहिणीची आणि आईचीही टेस्ट करण्यात आल्याचे दिलीप जोशी यांनी सांगितले. बहिण आणि आई दोघींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आम्हाला सुरुवातीला खूपच टेन्शन आले होते. 

मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर पवारांनी केलं भाष्य, हसले आणि म्हणाले...

बहिणीला लक्षणे दिसत नसल्याने घरीच क्वारंटाईन करत उपचार दिले जात आहेत. तर आईचे वय असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. रुग्णालय शोधताना आम्हाला खूप शोधाशोध करावी लागली. अखेर साई रुग्णालयात आईला दाखल करण्यात आले. तिच्यावर तेथे योग्य उपचार करण्यात आले. दहा दिवसांची तिची दुसरी टेस्ट करण्यात आली. ती चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर शनिवारी आईला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या आईची प्रकृती ठिक आहे, परंतू वय जास्त असल्याने तिला आराम करण्याचा सल्ला व काही औषधे सुरु ठेवण्यास डॉक्टरांनी सांगितले असल्याची माहिती सुशिला यांचा मुलगा दिलीप जोशी यांनी दिली.

आनंदाची बातमी! कोरोना उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजूरी... वाचा कोणते आहे 'ते' औषध

अवघ्या दहा दिवसांत आजींनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून घरी सोडताना रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. कोरोना आजार बरा होऊ शकतो, तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेवा, तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार सुरु ठेवा असेच आम्ही सांगू. आईचे वय जास्त असूनही तिने या वयात कोरोनाशी दोन हात केल्याने आमच्याही मनातील भीती कमी झाल्याचे दिलीप सांगतात.
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top