एकीकडे शेकडो व्हेन्टिलेटर्स रिक्त, तर दुरीकडे व्हेंटिलेटर अभावी जातोय जीव; महामुंबईसाठी आतातरी बनणार का स्वतंत्र डॅशबोर्ड ?

एकीकडे शेकडो व्हेन्टिलेटर्स रिक्त, तर दुरीकडे व्हेंटिलेटर अभावी जातोय जीव; महामुंबईसाठी आतातरी बनणार का स्वतंत्र डॅशबोर्ड ?

मुंबई : मुंबईत सध्याच्या परीस्थीत रोज 100 हून अधिक व्हेंटिलेटर रिक्त असताना जवळच्याच कळंबोली येथील एका महिलेला वेळीच व्हेंटिलेटर न मिळाल्याने प्राण गमवावे लागले. त्यामुळे आता महामुंबईतील रुग्णांसाठी स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्याची वेळ आली असल्याचे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अधिकारी नमुद करत आहेत.

मुंबईच्या सिमेवर असलेल्या मुलूंड आणि दहिसरमधील कोविड केंद्रांमध्ये ठाणे, मिरा भाईंदर आणि भिवंडी येथील रुग्णांसाठी खाटा आरक्षीत ठेवण्यात आल्या आहेत. तेथे व्हेंटीलेटरचीही सुविधा आहे. "शेजारील शहरातील डॉक्‍टरांकडून मुंबईतील पालिकेच्या डॉक्‍टरांशी बोलून काही रुग्ण पाठवले जातात. त्यांच्यावर उपचारही होतात", असे अतिरीक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी सांगितले.

डॉक्‍टर एकमेकांशी संपर्क साधून रुग्ण पाठवत असले तरी आता मुंबई शेजारील शहरात रुग्ण वाढू लागले आहे. त्यामुळे मुंबईतील सुविधांचा वापर करण्यास हरकत नाही. मुंबईत 1 हजार 89 व्हेंटीलेटर तयार आहे. एवढ्या मोठ्या संख्येत महामुंबईतील इतर सर्व शहरांचे मिळून नाही. तर, सध्या शहरातील 120 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत.

मुंबईतील 27 जूलैची परीस्थीती

  • रुग्णालयातील रिक्त बेड्‌स- 7081
  • रिक्त व्हेंटीलेटर - 120
  • रिक्त आयसीयू बेड्‌स-218
  • रिक्त ऑक्‍सीजन बेड्‌स-5005

याउलट कळंबोलीच्या पनवेल महापालिकेच्या हद्दीत 35 व्हेंटीलेटर असून त्या सर्वांचा वापर सुरु आहे. मुंबईतील आरोग्य व्यवस्थेवर पुर्वीपासून महामुंबईतील रुग्ण अवलंबून आहे. त्यामुळे आताही त्यांना जागा मिळायला हवी. असेही एका वैद्यकिय तज्ञांने सांगितले. मात्र, यासाठी महामुंबईसाठी स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्याची गरज आहे. तसे, करायचे नसल्यास समन्वयासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. जेणेकरुन रुग्णांचे हाल होणार नाहीत. व्हेंटीलेटर बरोबरच ऑक्‍सीजनबेड्‌स आणि ICU साठीही सुविधार वापरता येऊ शकते.

समन्वयाने बेड्‌स रुग्णांना उपलब्ध करुन देता येतील. मात्र, त्यासाठी शहरांसाठी ठराविक आरक्षण ठेवायची गरज नाही. त्यावेळच्या परीस्थीतीनुसार जागा उपलब्ध करुन देता येऊ शकते. जर, पनवेलच्या रुग्णाला मुंबईत जागा नसेल तर त्याला ठाणे, नवी मुंबईत महापालिकेमार्फतही जागा उपलब्ध करुन देता येईल. मात्र, त्यासाठी सर्व महापालिका आणि शहरांची माहिती एकत्रित उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.असेही मुंबई महानगर पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

( संकलन : सुमित बागुल )

amid corona hundreds of unused ventilators in mumbai but in MMR people are dying

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com