मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ घोटाळा : मुंबई आणि हैद्राबादसह नऊ ठिकाणी ED ची छापेमारी

सुमित बागुल
Tuesday, 28 July 2020

या प्रकरणातील कारवाई जसजशी पुढे जातेय तसे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होतायत. त्यामुळे सध्या हे प्रकरण आठशे कोटींचं असल्याचं बोललं जातंय जे की हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर येतेय. मुंबईत सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केलीये. मुंबई आणि हैद्राबादसह एकूण नऊ ठिकाणी ED ने आज छापेमारी केलीये. या आधी देखील ED आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशसन म्हणजेच CBI ने एकत्र येत जॉईंट ऑपरेशन राबवलं होतं. आज करण्यात येणाऱ्या छापेमारीचा तिसरा राउंड असल्याचं समजतंय. मुंबईमध्ये GVK ग्रुपचे अधिकारी आणि कर्मचारी ED च्या रडारवर असल्याचं समजतंय.  

काय आहे प्रकरण आणि किती कोटींचा घोटाळा ?

सदर प्रकरण तब्बल आठशे कोटींचं आहे. GVK चे मालक आणि मुंबईत इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड यांनी मिळून ८०० कोटींचा घोटाळा करून स्वतःच्या कंपनीला याचा फायदा करून घेतला असा त्यांवावर आरोप आहे. याबाबत आधी CBI आणि त्यानंतर आता ED ने केस रजिस्टर केली होती. याबाबत आता काही महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा ED शोध घेतंय.

मोठी बातमी - कोरोनामुळे ८१ वर्षीय बिल्डरचा झाला मृत्यू, शफिकने चालवली शैतानी खोपडी आणि आखला एक प्लॅन...

त्यासाठीच आजचं धाड सत्र आपल्याला पाहायला मिळतंय. यामधेय GVK यांचं ऑफिस सोबतच मुंबई विमानतळातील मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचं ऑफिस यामध्ये रेड मारण्यात आली. या दोघांव्यतिरिक्त काही प्रायव्हेट कंपन्यांना देखील यामध्ये सामील असल्याचं बोललं जातंय. या प्रायव्हेट कंपन्यांना विमानतळाच्या कामांचं कंत्राट देण्यात आलं होतं. त्यांनीही कामात घोटाळा केला आरोप आहे. या  कंपन्यांच्या ऑफिसमध्येही छापेमारी करण्यात आली आहे. 

मोठी बातमी - लॉकडाऊन काळातही अवैध दारुचा महापूर; तब्बल 'इतक्या' कोटीची दारु जप्त...

या प्रकरणातील कारवाई जसजशी पुढे जातेय तसे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होतायत. त्यामुळे सध्या हे प्रकरण आठशे कोटींचं असल्याचं बोललं जातंय जे की हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे आहे. GVK हे भारतातील एव्हिएशन इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. या कंपनीकडून एका विमातळाच्या बांधकाम आणि देखरेख कामामध्ये एवढा मोठा घोटाळा करणं म्हणजे एक खूप गंभीर बाब आहे. म्हणूनच CBI आणि ED मिळून आता या प्रकरणाच्या खोलात जाण्याचा प्रयन्त करतायत. 

ED raids GVK group and Mumbai international airport limited offices in money laundering case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED raids GVK group and Mumbai international airport limited offices in money laundering case