

Mumbai BJP president Amit Satam addressing the media while issuing a strong warning regarding Bangladesh players’ participation in the IPL.
esakal
Mumbai BJP’s Stand on Bangladesh Players in IPL : बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सातत्याने अल्पसंख्यांकांवर विशेषकरून हिंदूंवर जीवघेण्या हल्ल्याच्या आणि त्यांच्या निर्घृण हत्येच्या घटना घडत आहेत. यावरून बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षितेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारत सरकारने या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत बांगलादेश सरकारला जाब विचारला आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या घटनांवरून बांगलादेश सरकारव टीका सुरू आहे.
मात्र असे जरी असले तरीही अद्यापपर्यंत या घटना थांबल्याचे दिसत नाही. हिंदूंवर अत्याचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. यावरून संतप्त झालेले मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी एक इशारा दिला आहे. एकाही बांगलादेशी खेळाडूस मुंबईत खेळू देणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले की, ज्याप्रकारे हिंदूंवर बांगलादेशात अत्याचार होत आहेत. हिंदूंना जिवंत जाळलं जात आहे आणि ज्याप्रकारे बांगलादेश भारतविरोधी भूमिका घेत आहे. हे पाहता बांगलादेशच्या कोणत्याही खेळाडूला आम्ही आयपीएलमध्ये खेळू देणार नाही. ही राष्ट्रवादाची बाब आहे, राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडतोज केली जाणार नाही.
तसेच त्यांनी म्हटले की, हेच कारण आहे की बीसीसीआयने हे फरमान काढलं आहे. मग तो शाहरुख खानच्या टीममधील असेल किंवा आणखी एका टीमचा, बांगलादेशी खेळाडूंना कोणत्याही आयपीएल संघात खेळू देणार नाही. असंही साटम यांनी म्हटलंय.
याशिवाय, न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी उमर खालीद बाबत केलेल्या विधानावर बोलताना अमित साटम म्हणाले, काही आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये ज्याप्रकारे इस्लामी जिहादींनी कब्जा करून तेथील रंग बदलला आहे. त्याचप्रकारे मुंबईचा रंग बदलण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि हा एक आंरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग आहे.
ते म्हणाले, "काँग्रेस, सपा, एमआयएम, ठाकरे देशविरोधी शक्तींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु मुंबईकर जागरूक आहेत. मुंबईचा रंग बदलण्याचे असे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही मुंबईचे मोमडियेनाइजेशन होऊ देणार नाही."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.