Oppo Reno 15 Series Launch Date : तब्बल 200 मेगापिक्सेल कॅमेरा असणाऱ्या ‘Oppo Reno 15’ सीरीजची भारतातील ‘लाँच डेट’ जाहीर!

Oppo Reno 15 series : जबरदस्त फिचर्सची माहिती वाचून तुम्हीही आवाक व्हाल; जाणून घ्या, सविस्तर माहिती
Oppo Reno 15 Series featuring a powerful 200MP camera setup, premium design, and advanced smartphone technology ahead of its India launch.

Oppo Reno 15 Series featuring a powerful 200MP camera setup, premium design, and advanced smartphone technology ahead of its India launch.

esakal

Updated on

Oppo Reno 15 200MP Camera Features : ‘ओप्पो’ लवकरच भारतात तब्बल २०० मेगापिक्सेल कॅमेरा असलेला एक मिड-बजेट स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने या आगामी मिड-बजेट स्मार्टफोन सीरजच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. ही स्मार्टफोन सीरीज पुढील आठवड्यात भारतीय बाजारात लाँच केली जाईल.  

मागील वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत लाँच झालेल्या ओप्पो रेनो 14 सीरजचे हे अपग्रेड व्हर्जन असणार आहे. कंपनी या सीरजमधील तीन फोन सादर करणार आहे. ज्यामध्ये ओप्पो रेनो 15, ओप्पो रेनो 15 प्रो आणि ओप्पो रेनो 15 प्रो मिनी यांचा समावेश आहे.

कंपनीने पुष्टी केली आहे की ओप्पोची ही मिड-बजेट स्मार्टफोन सीरीज ८ जानेवारी रोजी भारतात लाँच केली जाईल. या वर्षी लाँच होणारी ही कंपनीची पहिली स्मार्टफोन सीरीज असेल. ओप्पोने फोनची अनेक वैशिष्ट्ये देखील जाहीर केली आहेत. ही स्मार्टफोन सीरीज प्रो-टोन टेक्नॉलॉजी आणि एआय फिचर्ससह सुसज्ज असेल. या सिरजमधील दोन्ही प्रो मॉडेलमध्ये २०० मेगापिक्सेल अल्ट्रा-क्लीअर मुख्य कॅमेरा असेल. या स्टँडर्ड मॉडेलमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य OIS कॅमेरा असेल. या फोनचा बॅक पॅनल आयफोन प्रो सिरीजपासून इन्स्पायर्ड आहे.

Oppo Reno 15 Series featuring a powerful 200MP camera setup, premium design, and advanced smartphone technology ahead of its India launch.
Government Decision on Gig Workers : ‘गिग वर्कर्स’बाबत सरकारचा मोठा निर्णय! ‘Social Security Cover’सह बरच काही मिळणार मात्र...

या सिरीजच्या प्रो मॉडेलमध्ये २०० मेगापिक्सेल कॅमेऱ्याव्यतिरिक्त ५० मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा असेल. याव्यतिरिक्त, फोनमध्ये ३.५x ऑप्टिकल झूमसह ५० मेगापिक्सेल टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा देखील असेल. एआय फीचर्ससह सुसज्ज असलेल्या या सिरीजमध्ये एआय एडिटर ३.० असेल, ज्यामध्ये एआय पोर्ट्रेट ग्लो आणि एआय मोशन फोटो स्लो-मो सारख्या फीचर्सचा समावेश असेल.

Oppo Reno 15 Series featuring a powerful 200MP camera setup, premium design, and advanced smartphone technology ahead of its India launch.
Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

याव्यतिरिक्त ओप्पो रेनो 15 सिरीजच्या पूर्वी लीक झालेल्या फीचर्सबद्दल, प्रो मिनी मॉडेलमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट असलेली ६.३ इंचाची फ्लॅट ओएलईडी स्क्रीन असेल. या सिरीजच्या स्टँडर्ड आणि प्रो मॉडेलमध्ये ६.९ इंचाची ओएलईडी डिस्प्ले असू शकते. दोन्ही प्रो मॉडेल्समध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ८४५० प्रोसेसर, १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असण्याची शक्यता आहे. तसेच, ओप्पो रेनो 15 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जनरल ४ प्रोसेसर आणि या फोनमध्ये ८० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६५०० एमएएच बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. तर मिनी मॉडेलमध्ये ८० वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६२०० एमएएच बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com