esakal | शिवाजीपार्क मैदानावर अमित ठाकरेनी मारला दमदार गोल
sakal

बोलून बातमी शोधा

mumabi

शिवाजीपार्क मैदानावर अमित ठाकरेनी मारला दमदार गोल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

प्रभादेवी :- राजकीय मैदानात सभा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून दिसणाऱ्या अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी शिवाजीपार्क (Shivaji Park) मैदानावर एका फुटबॉल (Football) स्पर्धेच्या सामन्यात मैदानात उतरून दमदार गोल मारत खेळाचा आनंद लुटला.

दादर शिवाजीपार्क येथे हौशी फुटबॉल संघाने मनसेच्या पुढाकारातून फुटबॉल सामान्यचे आयोजन केले होते या सामन्याचा शुभारंभ मनसेचे अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी अमित ठाकरे स्वतः मौदानात उतरून स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब संघातून खेळत बांद्राच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब या प्रतिस्पर्धी संघावार दोन गोल करत यशस्वी खेळी केली.

हेही वाचा: 'खऱ्या आयुष्यात महात्मा गांधी दिसतात का?'; शाहरुखच्या प्रश्नावर संजय दत्त म्हणाला..

मनसेच्या वतीने हौशी खेळाडूंसाठी दरवर्षी फुटबॉलच्या स्पर्धा खेळविण्यात येतात मात्र कोरोनामुळे त्या घेता आल्या नाहीत अमित ठाकरे यांना फुटबॉल खेळाची आवड आहे ते स्वतः मैदानात उतरल्यामुळे खेळाडूनचा उत्साह वाढला असे मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

loading image
go to top