
Amit Thackeray : भारतानं पाकिस्तानविरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपनं आपल्या सैन्य दलांच्या सन्मानार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढल्या आहेत. या यात्रेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.
भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवलेला नाहीतर केवळ दोन्ही देशांमध्ये सिजफायर अर्थात युद्धविराम झालेला आहे. त्यामुळं ज्या विजय यात्रा काढल्या जात आहेत, त्या समर्पक नाहीत, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सविस्तर पत्र लिहून अमित ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.