Amitabh Bachchan: 'जलसा'चा वाद नव्या वळणावर! बंगल्याच्या प्रॉपर्टी कार्डवर रमोला बच्चन यांचे नाव

Amitabh Bachchan Jalsa Bungalow: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या प्रॉपर्टी कार्डवर रमोला बच्चन यांचे नाव आहे. यामुळे बंगल्याच्या मालकीवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
Amitabh Bachchan Jalsa Bungalow

Amitabh Bachchan Jalsa Bungalow

Esakal

Updated on: 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा बंगल्याच्या मालकीवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रॉपर्टी कार्डवर अमिताभ यांचे धाकटे बंधू अजिताभ बच्चन यांच्या पत्नी रमोला बच्चन यांचे नाव अजूनही नोंदवलेले आहे. तर कपोल हाउसिंग सोसायटीच्या नोंदींमध्ये जया बच्चन यांचे नाव मालक म्हणून आहे. त्यामुळे बंगल्याच्या मालकीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

Loading content, please wait...