

Three Infants Die in Amravati Hospital Fire Over Ventilator Maintenance Lapse Five Officials Suspended After Inquiry
sakal
मुंबई : अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून झालेल्या तीन अर्भकांच्या मृत्यूची दुर्घटना व्हेंटिलेटरच्या देखभाल-दुरुस्तीअभावी घडल्याचा निष्कर्ष राज्य सरकारच्या उच्चस्तरीय चौकशी समितीने काढला आहे. या प्रकरणात अक्षम्य हलगर्जी आणि बेजबाबदारपणा दाखविल्याप्रकरणी अकोला परिमंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांसह पाच जणांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.