
मुंबई : गणेशोत्सव म्हटलं की मोदकांची गोडी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावते. पारंपरिक उकडीचे आणि तळलेले मोदक आता फक्त घराघरांतूनच नव्हे, तर महिला बचत गटांच्या हातून तयार होऊन सरसकट मुंबईकरांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत. यंदा या मोदकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वरून थेट मागणी मिळाल्याने महिला बचत गटांचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे.