मुले कंटाळली...अॅम्युझमेंट पार्क सुने सुने

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Updated on

मुंबई : एप्रिल महिना अर्धा संपला तरी मुंबई आणि परिसरातील अॅम्युझमेंट पार्क सुनी सुनी आहेत. शनिवारी-रविवारी अॅम्युझमेंट पार्कमध्ये अनेक कुटुंबे गर्दी करतात. उन्हाळी सुटीत तर चांगलीच गर्दी होते, पण आता अर्धा एप्रिल सरला तरी पार्कभोवती गर्दी नाही.

हे वाचलं का? : चिंताजनक! नौदलाचे 26 खलाशी कोरोना पाॅझिटिव्ह

भारतातील अॅम्युझमेंट उद्योगसमूहातील वार्षिक उलाढाल दोन हजार सातशे कोटींची आहे. मात्र आता अकराशे कोटींचा तोटा सहन करावा लागेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. ``अॅम्युझमेंट पार्कमध्ये मार्च ते जूनमध्ये जास्त गर्दी असते. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यानही काही कारणास्तव वाया गेले होते. पार्क 15 मार्चपासून बंद आहेत. लॉकडाऊन संपल्यावरही परिस्थिती फारशी बदलण्याची शक्यता नाही," असे अॅम्युझमेट पार्क आणि उद्योगांचे अध्यक्ष अजय सरीन यांनी सांगितले. 

हेही वाचा : पाच लाख नाका कामगारांची चूल पेटेना

कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल वातावरणाचा फटका मॉलमधील पार्कनाही बसणार आहे. या इंडस्ट्रीवर अनेक स्थानिक उद्योग अवलंबून असतात. त्याचबरोबर परिसरातील स्थानिकांना गर्दीच्या मोसमात तात्पुरते नोकरीस घेतले जाते. आताही गर्दी न झाल्यास अनेकांचा रोजगार बुडणार आहे.
 
मोठ्या उत्पन्नावर पाणी
अॅम्युझमेंट पार्कना वर्षातील निम्म्याहून जास्त उत्पन्न उन्हाळी सुटीत मिळते. ही कमाई प्रसंगी 70 टक्क्यापर्यंत असते. लॉकडाऊनमुळे नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पगारात कपात झाली आहे. जोडीला कोरोनाची भिती आहेच. अशा परिस्थितीत उत्पन्न मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असेही सांगितले जात आहे. 

सावरण्यास तीन ते चार वर्षे 
अॅम्युझमेंट पार्क आणि त्यासंदर्भातील उद्योगांची चांगली प्रगती अपेक्षित होती. त्यातील कमाई साडेसात हजार कोटींपर्यंत जाईल, असा कयास व्यक्त केला जात होता, पण कोरोनामुळे सगळेच चित्र बदलले. आता मोठी पिछेहाट यंदाच्या सुटीच्या मोसमात होईल. त्यातून सावरण्यास तीन ते चार वर्षे लागतील, अशी भिती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com