esakal | चिंताजनक ! नौदलाचे 26 खलाशी कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

चिंताजनक ! नौदलाचे 26 खलाशी कोरोना पॉझिटिव्ह

नौदलाच्या पश्चिम विभागीय कमांडमधील आयएनएस आंग्रे तळावरील 26 खलाशी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत

चिंताजनक ! नौदलाचे 26 खलाशी कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई :  नौदलाच्या पश्चिम विभागीय कमांडमधील आयएनएस आंग्रे तळावरील 26 खलाशी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तरीही नौदलाच्या युद्धनौका व पाणबुड्यांवरील सर्व खलाशी सुखरूप असल्याने नौदल कोणत्याही कामगिरीसाठी सज्ज असल्याची ग्वाही नौदलातर्फे देण्यात आली आहे. 

सात एप्रिल रोजी आंग्रे शेजारच्या नौदल साह्यसंस्थेतील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यावर नौदलाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सतत तपासण्या व चाचण्या केल्याने आंग्रे तळावरील हे २६ खलाशी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यानंतर अजूनही आरोग्यविषयक सर्व निकषांचे काटेकोर पालन केले जात असून तपासण्या व चाचण्याही सुरु आहेत.

मोठी बातमी -  ठाण्यात आणखी एका कोरोनाबाधितचा मृत्यू, रुग्णांचा आकडा 100 पार

तसेच संशयितांचे विलगीकरण तसेच संबंधित विभाग सील करण्याची कार्यवाही सुरु आहे. नौदलाच्या सर्व युद्धनौका, पाणबुड्या तसेच लढाऊ विमाने आपल्या नियमित कर्तव्यावर रुजू असून कोरोना साथीशी लढा वा हिंदी महासागर विभागातील आपल्या मित्रदेशांना साह्य अशा कोणतीही मोहीम हाती घेण्यास सज्ज आहे. मलाक्का सामुद्रधुनीपासून ते एडनच्या आखातापर्यंत आपल्या तसेच मित्रदेशांच्या व्यापारी जहाजांना संरक्षण देण्याची ऑपरेशन संकल्प ही मोहीमही सुरु असल्याचे नौदलाने स्ष्ट केले आहे.

मोठी बातमी 4 मे पासून एअर इंडियाच्या विमानांचं बुकिंग सुरु, 4 मेपासून देशांतर्गत विमानसेवेला होणार सुरुवात?
 

26 indian navy sailors detected positive read full story