पाच लाख नाका कामगारांची चूल पेटेना 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

सरकारच्या मदतीकडे कामगारांचे डोळे; गावी जाण्याची व्यवस्था करण्याची मागणी 

मुंबई : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या कोंकण विभागातील तब्बल पाच लाख नाका आणि बांधकाम कामगारांना याचा फटका बसला आहे. रेशनकार्ड असणाऱ्या कामगारांना शिधा मिळाला आहे, मात्र ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे निदान गावी जाण्याची तरी सरकारने सोय करावी, अशी आर्त हाक कामगार देऊ लागले आहेत. 

हे वाचलत का...मातांनो आता बाळाची काळजी घ्या 

राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु ज्या लाखो असंघटितकामगारांचीकामगार विभागाकडे नोंदणीचनाही अशा कामगारांना दानशूरलोक आणि संस्थांमार्फत होणाऱ्यामदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि नवी मुंबईतील तब्बल 350 नाक्‍यांवर पाच लाख कामगार येतात. नाक्‍यांवर मिळेल ते काम करून दिवसाला 250ते300 रुपये पदरात पडून घेतात. दिवसभर केलेल्या मेहनतीतून मिळणाऱ्या पैशातून संध्याकाळी घरातील चूल पेटते. जे असेल ते खाऊन कुटुंब पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या रोजनदारीच्या मागे पडतात. 

हे वाचलत का...20 एप्रिलनंतर घरपोच मध्यविक्री 

लॉकडाऊनमुळे सर्व नाके सुने पडले आहेत. हाताला काम नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या कामगारांकडे रेशनकार्ड आहे, त्यांना सरकारकडून रेशनिंगवर तांदूळ गहू मिळाला. पणज्यांच्याकडे रेशनकार्डनाही अशा लोकांना कोणतीही मदत होऊ शकलेली नाही. त्यामुळे चेंबूर, मानखुर्द, कल्याण, बदलापूर आदी ठिकाणी राहत असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बदलापूर येथेतब्बल7 ते8 हजार राहत असून त्यांना सरकारकडून मदत झालेली नाही. त्यामुळे या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ अली असल्याचे नाका कामगार बसवराज राठोड यांनी सांगितले. 
 

लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. काही वर्षांपूर्वी कामासाठी यवतमाळहून मुंबईला आलो. मात्र आता हातात पैसे नसल्याने हतबल झालो आहे. सरकारने रेशन दिले. मात्र कुटुंब मोठे असल्यानेते किती दिवस पुरणार. यामध्ये लहान मुलांची तारांबळ होत असून सरकारने निदान आमची गावी जाण्याची व्यवस्था तरी करावी. 
- निलेश राठोड, नाका कामगार 

अनेक नाका कामगारांची राज्य सरकार दरबारी नोंदणीच अद्याप झालेली नाही. त्यामुळे सरकारकडून त्यांना मदत मिळत नाही. या संकटसमयी सरकारने या कामगारांना निदान डाळ आणि तांदूळ दिला तरी यांना दोन वेळचे जेवण मिळेल. 
- ऍड. नरेश राठोड, अध्यक्ष, नाकाकामगार संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five lakh naka workers in crisis