'पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार नाही', आणखी एका स्पर्धकाचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार नाही', आणखी एका स्पर्धकाचा निर्णय
'पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार नाही', आणखी एका स्पर्धकाचा निर्णय

'पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार नाही', आणखी एका स्पर्धकाचा निर्णय

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या बिग बॉसमध्ये दरवेळी काही ना काही घडामोडी होतच असतात. गेल्या काही दिवसांपासून हा शो बंद होणार असल्याची चर्चा होती. कारण पहिल्यांदाच या सीझनमध्ये बिग बॉसचा टीआरपी वेगानं खाली आला आहे. त्याला प्रेक्षकांचा नेहमीप्रमाणे मिळणारा प्रतिसाद यंदा कमी झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांनी हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दुसरी गोष्ट म्हणजे या शो मधील अनेक स्पर्धक आजारी असल्यानं त्यातून माघार घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात बिग बॉसमधून या कार्यक्रमाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आता या शो मधील एक लोकप्रिय स्पर्धक राकेश बापट यानं आपल्याला पुन्हा या शो मध्ये यायचं नसल्याचं सांगितलं आहे. वास्तविक वाईल्ड कार्डमधून बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये इंट्री करणाऱ्या राकेशनं एक मोठा निर्णय घेतला आहे. तो आता आजारी असल्यानं बिग बॉसच्या घराबाहेर आहे. याशिवाय त्याची मैत्रीण आणि बिग बॉसची स्पर्धक शमिता शेट्टी देखील रुग्णालयात असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. बिग बॉसनं शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यासाठी एका डिनर डेटचं आयोजन केलं होतं. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. राकेश जेव्हा ज्या डिनर डेटवरुन परतला तेव्हापासून त्याच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली. त्यानंतर बिग बॉसमध्ये एका डॉक्टरांना बोलवण्यात आले. त्यांनी राकेशला रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

या आठवड्यामध्ये दोन स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर गेले आहेत. आता राकेशनं ही बिग बॉस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अफसाना खाननं केलेल्या कृत्यामुळे बिग बॉसनं तिला स्पर्धेतून बाद केले. मात्र यासगळ्यावर शमितानं सांगितलं आहे की, राकेश हा थोड्याच दिवसांसाठी घराबाहेर गेला आहे. तो लवकरच आपल्यात परतेल. मात्र त्यासाठी वाट पाहावी लागेल. तो त्याच्या आजारातून बरा झाल्यावर पुन्हा घरात येईल अशी आशा तिनं यावेळी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

हेही वाचा: 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

loading image
go to top