Mumbai News: जुहूमध्ये नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू, मॉन्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह; निष्काळजीवर संताप

Mumbai Drain Cleaning Work: जुहूमध्ये नाल्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिक महापालिकेच्या मॉन्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
Youth dies by falling into drain

Youth dies by falling into drain

ESakal

Updated on

मुंबई : पहिल्याच काही दिवसांच्या पावसात महापालिकेच्या मॉन्सूनपूर्व कामांची आणि सुरक्षेची पोलखोल झाली आहे. पालिकेच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारामुळे मुंबईतील उघड्या नाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा निष्पाप मुंबईकरांच्या जीवावर उठला आहे. अंधेरी पश्चिमेकडील जुहू परिसरात शनिवारी (ता. २७) दुपारी उघड्या नाल्यात पडून एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. निहाल नाझिम मिर्झा असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com