Andheri Byelection: राज ठाकरेंचं पत्र ही भाजपची स्क्रीप्ट; संजय राऊतांच्या प्रतिक्रियेनं खळबळ

यामध्ये सहानुभूतीचा कुठलाही फॅक्टर नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut Sakal
Updated on

मुंबई : भाजपनं आपला उमेदवार मागे घेतल्यानं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील चुरस जवळपास संपुष्टात आली आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोर्टाच्या आवारात यावर प्रतिक्रिया दिली आहे. पराभवाची चाहूल लागल्यानेच भाजपनं उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र हा भाजपच्या स्क्रीप्टचाच एक भाग असल्याचा आरोप यावेळी राऊत यांनी केला. (Andheri Byelection Raj Thackeray letter is BJP script Sanjay Raut reaction)

Sanjay Raut
मुरजी पटेलांच्या समर्थकांना शेलारांनी दिला नवा कार्यक्रम; म्हणाले, ऊर्जा राखून ठेवा, दोन महिन्यांनी...

संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या जामीनावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होती, यासाठी ते कोर्टात उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी करत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी माघारी घेण्याची विनंती राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून केली होती. परंतू हे पत्र म्हणजे भाजपच्या स्क्रीप्टचा एक भाग होता, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut
Raj Thackeray: राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार; म्हणाले, अशीच राजकीय संस्कृती...

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ४५ हजारांच्या मताधिक्यानं जिंकणार होता, असा सर्वे भाजपच्यावतीनं करण्यात आला. यामध्ये पराभव दिसू लागल्यानं भाजपनं आपला उमेदवार मागे घेतला आहे. भाजपनं रितसर अभ्यास करुन आपला उमेदवार मागे घेतला. यामध्ये सिंपथी फॅक्टर काहीही नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com