
राज्यात पावसाचा जोर वाढला असून काही भागात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. तर मुंबईत अंधेरीतील मरोळ परिसरात माती खचल्यानं ढिगाऱ्याखाली अडकून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ही घटना घडली असून मृत्यू झालेला बांधकाम कामगार होता. सोनेलाल प्रसाद असं कामगाराचं नाव आहे. तर जखमी झालेल्या दुसऱ्या कामगारावर उपचार केले जात आहेत.