

Alleged Conversion Attempt at Andheri Station Goes Viral
Esakal
Mumbai News: मुंबईतील अंधेरी स्थानकातला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका प्रवाशानं हा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्यात दावा करण्यात आलाय की एका वृद्धाकडून तरुणीचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिसतं की, संबंधित व्यक्ती एका बाकड्यावर बसलेल्या तरुणीच्या समोर उभा होता. तिने हात जोडले असून डोळे बंद केले होते. तिच्या डोक्यावर हात धरून प्रार्थना करत होता.