Uddhav Thackeray: "हे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर..."; अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा इशारा

आज सकाळपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. महापालिका रस्ता देखील सेविकांनी रोखून धरला होता. दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलना भेट दिली.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal

Uddhav Thackeray: आझाद मैदानावर आज अंगणवाडी सेविकांचा महामोर्चा आहे. प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत. आज सकाळपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. महापालिका रस्ता देखील सेविकांनी रोखून धरला होता. दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलना भेट दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी भाऊ म्हणून आंदोलनात सहभागी होत आहे. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. हल्ली क्रांतीज्योती, क्रांतीसूर्य अशी बिरुदं लावू शकू, अशी माणसे उरली नाही आहेत. तुम्ही सर्व सावीत्रीच्या लेकी आहात. असंख्य ज्योती एकत्र येतात. तेव्हा त्याची मशाल तयार होते. हे मशाल सत्ता खाली खेचण्यासाठी तयार असते.

सेवा करणारे हात जार एकमेकांवर आपटले तर एवढा आवाज येतो. जर हे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर केवढा मोठा आवाज येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Jayant Patil : ''मी गरीब माणूस, माझा कुणाशीही वाद नाही'', अंतर्गत कलहाच्या चर्चांवर जयंत पाटील काय म्हणाले?

मी मुख्यमंत्री होतो तेव्हा संपूर्ण जग कोरानाचा सामना करत होता. तेव्हा अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सेवा करत होता. मात्र ८ महिने झाले सरकार त्यांचे ऐकत नाहीत. आमचं सरकार पडलं नसत तर तुम्हाला आंदोलनासाठी मुंबईत यावं लागलं नसतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आरोप केला, "माझं ऑपरेशन होताच सरकार पाडलं. या खोके सरकारकडे हक्काचे मानधन द्यायला पैसे नाहीत. सरकारकडे जाहिरातींसाठी पैसे आहेत. मात्र अंगणसेविकांसाठी नाहीत." (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
Kerala High Court: पतीने संमतीविरुद्ध लैंगिक संबंध ठेवल्यास पत्नीला घटस्फोटाचा अधिकार; न्यायालयाचा मोठा निर्णय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com