सुशांतची आत्महत्या की हत्या? अंकिता लोखंडेचं 'हेटर्स'ना सविस्तर पत्र

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

अंकिता लोखंडे हिने बुधवारी सोशल मीडियावरून सुशांतच्या मृत्यू प्रकऱणी तिच्या हेटर्सना उद्देशून मोठी पोस्ट केली आहे. त्यामध्ये अंकिताने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत असून ड्रग्ज प्रकऱणी रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली आहे. दरम्यान, अंकिता लोखंडे हिने बुधवारी सोशल मीडियावरून सुशांतच्या मृत्यू प्रकऱणी तिच्या हेटर्सना उद्देशून मोठी पोस्ट केली आहे. त्यात तिने असं म्हटलं की, मी कधीच सुशांतच्या हत्येचा दावा केला नाही. मात्र माझ्या दिवंगत मित्राला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही इच्छा आहे. रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेनं ट्विटरवर न्याय मिळाला असं ट्विट केलं होतं. 

अंकिताने आता एक पत्र लिहिलं असून त्यात म्हटलं की, तुम्हाला तुमच्या मित्राबद्दल सर्व काही माहिती असेल, त्याच्या आयुष्यात, रिलेशनशिपमध्ये काय घडतंय हेसुद्धा माहिती असेल असं मानलं. शेवटी तुम्हाला जाग आली पण वाईट एका गोष्टीचं वाटतं की तुम्हाला लवकर ही गोष्ट समजली नाही. तसं असतं तर तुम्ही तुमच्या मित्राला ड्रग्ज घेण्यापासून परावृत्त केलं असतं. त्यांना सुशांतच्या मानसिक स्थितीची माहिती होती. सुशांत डिप्रेशनमध्ये होता असंही स्पष्ट सांगितलं होतं. 

नैराश्य आलेल्या माणसाला ड्रग्ज घेण्याचा सल्ला द्यावा का? असा प्रश्न रियाला अंकिताने विचारला आहे. सुशांतच्या जवळची असल्याचे ती सांगते पण त्याच्या उपचारात डॉक्टरांशी चर्चा कऱण्याचं सोडून ती ड्रग्जसाठी को ऑर्डिनेट करत होती असं म्हणत रियावर निशाणा साधला आहे. 

हे वाचा - सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणः रिया चक्रवर्ती दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी

माध्यमांकडून अंकिताला वारंवार सुशांतची आत्महत्या की हत्या असा प्रश्ना विचारला जातो. त्यावर अंकिताने म्हटलं की, मी स्पष्टपणे सांगते की मी कधीच ही हत्या असल्याचं म्हटलं नाही. मात्र माझा मित्र आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी इच्छा आहे. राज्य आणि केंद्र सरकारसह तपास यंत्रणांवर पूर्णपणे विश्वास आहे. माझ्यासाठी विधवा आणि सवत अशा शब्दांचा वापर झाला. मी तर फक्त सुशांतच्या 2016 मध्ये मानसिक आरोग्याबाबत बोलण्यासाठी पुढे आले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ankita lokhande write letter to haters she says i never claim it was murder