
मुंबई : रिपब्लिक भारत वृत्तवाहनीचे अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पायधुनी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे येथे जमलेल्या मजुरांच्या गर्दीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
नक्की वाचा : कोरोना योद्धांना भारतीय हवाई दलाकडून अनोखी मानवंदना
रझा अकादमीचे सचिव इरफान शेख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 एप्रिलला गोस्वामी यांनी वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील झालेली गर्दी ऐवजी एका धार्मिक स्थळाजवळ ही गर्दी झाल्याचा दावा केला होता. तसेच विशेष समुदायाचे नागरिकच का गर्दी करतात, अशा दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी दक्षिण मुंबईतील पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 153, 153(अ), 295(अ), 500, 505(2),511, 120(ब) 505(1)(ब)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोस्वामी यांच्यासह रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीच्या मालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Another case has been registered against Arnab Goswami for bandra reason
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.