150 विक्रेत्यांना लागण; संक्रमण रोखण्यासाठी पालिकेचा कोरोना चाचण्यांवर भर

भाग्यश्री भुवड
Sunday, 29 November 2020

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका जोरात कामाला लागली आहे. बाजारातील विक्रेत्यांद्वारे संक्रमण वाढू नये, यासाठी पालिकेने शोधमोहीम सुरू केली आहे. गेल्या पाच दिवसांत सुमारे 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका जोरात कामाला लागली आहे. बाजारातील विक्रेत्यांद्वारे संक्रमण वाढू नये, यासाठी पालिकेने शोधमोहीम सुरू केली आहे. गेल्या पाच दिवसांत सुमारे 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

जीवनशैली आणि बिघडलेले आरोग्य कोरोना मृत्यूदर वाढवण्याचे प्रमुख कारण

राज्य सरकार कोरोना रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचणीवर भर देत आहे. संभाव्य संक्रमक म्हणजेच बस वाहक, चालक, भाजी विक्रेते, फेरीवाले, ऑटो-टॅक्सीचालकांची चाचणी घेण्यास आग्रह धरण्यासाठी सरकारने स्थानिक पालिका आणि जिल्हा अधिका-यांना सांगितले आहे. या कार्यक्षेत्राशी संबंधित लोक बर्‍याच लोकांच्या संपर्कात येतात. यापैकी कोणत्याही व्यक्तीस विषाणूची लागण झाल्यास त्यांच्या संपर्कात येणारे शेकडो लोक संसर्गित होऊ शकतात. त्यांना लक्षणे जाणवेपर्यंत अनेक जण संक्रमित होतील. अशा परिस्थितीत संपर्क ट्रेसिंग हे एक मोठे आव्हान बनले आहे.

कोरोनामुक्तीनंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष नकोच! आमदार भालकेंच्या निधनानंतर गुंतागुंतीची समस्या ऐरणीवर

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी असते. अशा परिस्थितीत संसर्ग होण्याचा धोका असतो. विक्रेता संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊन त्यांचाही जीव जाऊ शकतो. आता तपासणीच्या मदतीने हे कळेल की कोण सुरक्षित आहे आणि विषाणूच्या विळख्यात आले आहे; परंतु प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. सामाजिक अंतराचे अनुसरण केले पाहिजे. मास्क लावावेत आणि कोरोनाशी लढा देण्यासाठी आपली भूमिका बजावायला हवी.

मुंबईत रोज 18 ते 19 हजार लोकांची आरटीपीसीआर आणि जलद चाचणी घेण्यात येत आहे. एकूण चाचण्यांपैकी सुमारे 3000 संभाव्य स्प्रेडर्सची चौकशी केली जात आहे. गेल्या चार दिवसांत मुंबईच्या विविध बाजारपेठांमध्ये सुमारे 12 हजार दुकानदार, भाजीपाला, फळे आणि इतर विक्रेत्यांची जलद चाचणी घेण्यात आली. त्यापैकी सुमारे दीडशे लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त (आरोग्य) 

शताब्दी रुग्णालयातील प्लाझ्मा केंद्र कागदावरच; इमारतीच्या पेचामुळे रखडपट्टी

 

बाजाराव्यतिरिक्त वाहनचालकांच्या चाचणीसाठी आरटीओ, दहिसर येथे कोरोना तपासणी केंद्र सुरू करण्याचे आम्ही नियोजन केले आहे. बरेच वाहनचालक आरटीओशी संबंधित कामावर येतात. अशा परिस्थितीत आम्ही आरटीओत येणाऱ्या सर्व लोकांची चौकशी करू.
- संध्या नांदेडकर, आर उत्तर वॉर्ड, सहायक पालिका आयुक्त

-------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infected 150 vendors; BMC corona tests to prevent infection