विधानपरिषद निवडणुकीत आणखी एक 'ट्विस्ट', भाजपने उमेदवारच बदलला

bjp
bjp

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये मतभेद बघायला मिळत होते. त्यावर तोडगा काढत काँग्रेसनं एकच उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत अजून एक ट्विस्ट आला आहे. गोपछडेंचा अर्ज मागे घेत भाजपनं आता रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीट देऊ केलंय. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप ऐनवेळी कुठलातरी धक्का देणार अशी कल्पना सर्वांनाच होती. त्यानुसार आता अचानक गोपछडे यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या जागेवर लातूरचे रमेश कराड यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. रमेश कराड हे हे आधीपासूनच ताकदवान उमेदवार मानले जात होते. भाजप त्यांना महाविकास आघाडीच्या अडचणी वाढवण्यासाठी पाचवा डमी उमेदवार म्हणून अर्ज भरायला लावणार अशी चिन्हं दिसत होती. मात्र आता भाजपनं सर्वांनाच धक्का देत रमेश कराड यांना तिकीट दिलं आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ खडसे या दोघांनाही भाजपनं याही वेळी तिकीट नाकारलं आहे. तसंच पंकजा मुंडे यांनाही विधान परिषदेचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे दिल्लीत बसलेल्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या मनात काय चाललंय हे कोणालाही कळू शकत नाहीये. तीन वर्षांपूर्वी रमेश कराड यांनी भाजपला धक्का देऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेचा अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी तो अर्ज मागे घेत त्यांनी पंकजा मुंडे यांच्या गटात प्रवेश केला होता. लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला गेल्यामुळे ते इच्छुक असूनही विधानसभेला उभे राहू शकले नव्हते मात्र आता भाजपनं त्यांना थेट विधानपरिषदेचं तिकीट देऊ केलं आहे.

Another twist in the Legislative council, the BJP changed the candidate

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com