सूर्याच्या UV Rays मुळे कोरोना बरा होतो ?  जाणून घ्या व्हायरल सत्य असत्य 

सूर्याच्या UV Rays मुळे कोरोना बरा होतो ?  जाणून घ्या व्हायरल सत्य असत्य 

मुंबई : कोरोनानं संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. तब्बल ९०००० पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अजूनही कोरोनावर कुठल्याही प्रकारचं औषध तयार करण्यात आलं नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर कोरोनाच्या उपचारांबद्दल अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत.

सूर्याच्या अतिनील म्हणजेच अल्ट्राव्हॉयलेट किरणांमुळे कोरोनापासून आपण बचाव करू शकतो असे मेसेज आणि त्यासंबंधीच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सूर्यातून येणाऱ्या अल्ट्राव्हॉयलेट किरणांमुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि या उष्णेतेमुळे कोरोना व्हायरस जास्त काळ तुमच्या शरीरात राहू शकत नाही, अशा काही पोस्ट आहेत. या पोस्ट सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, इंस्टाग्राम आणि WhatsApp वर चांगल्याच व्हायरल होत आहेत. मात्र आम्ही आज तुम्हाला या व्हायरल पोस्ट मागचं सत्य सांगणार आहोत.

अतिनील किरणांमुळे बरा होऊ शकतो कोरोना ?

जागतिक आरोग्य संघटनेनं अल्ट्राव्हॉयलेट किरणांबाबत खुलासा केला आहे. "अल्ट्राव्हॉयलेट किरणांचा उपयोग हात पाय आणि शरीर सॅनेटाईझ करण्यासाठी केला जाऊ नये, यामुळे तुमची त्वचा जळू शकते" अशी पोस्ट जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या फेसबुक अकाउंटवरून केली आहे.

काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अल्ट्राव्हॉयलेट किरणांचे एकूण तीन प्रकार आहेत. त्यात एक प्रकार UVC आहे. या अल्ट्राव्हॉयलेट किरणांमुळे व्हायरसचा नाश होऊ शकतो. मात्र अल्ट्राव्हॉयलेट किरणांच्या या प्रकारात उष्णतेचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे मानवी शरीर जळूही शकतं.

अल्ट्राव्हॉयलेट किरणं मानवी शरीराला मोठ्या प्रमाणात गंभीर हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे आपल्याला या किरणांपासू दूर राहायला हवं असं वैज्ञनिकांचं मत आहे.

दरम्यान भारतात उन्हाळा सुरु होतोय, त्यामुळे उन्हात हे व्हायरस मारतील का? हाही प्रश्न लोकांना पडतोय. मात्र सूर्यप्रकाशात अल्ट्राव्हॉयलेट किरणं फार कमी प्रमाणात असतात त्यामुळे या किरणांमुळे व्हायरस मरत नाहीत, असं भारतीय वैज्ञानिकांचं मत आहे.

या व्हायरसला कमी करणाऱ्या अल्ट्राव्हॉयलेट किरणांवर अजून शोध सुरु आहे असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे अल्ट्राव्हॉयलेट किरणांमुळे कोरोनापासून बचाव केला जाऊ शकतो हे खरं आहे, मात्र वैज्ञनिकांच्या म्हणण्यानुसार हे मानवी शरीरासाठी घातक आहे हे आता स्पष्ट झालंय.

are UV rays helpful for killing corona virus read full article and check real facts

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com